Pune Railway News : दुरुस्तीच्या कामासाठी कान्हे रेल्वे फाटक शनिवारी, रविवारी बंद

एमपीसी न्यूज – दुरुस्तीच्या कामासाठी कान्हे येथील रेल्वे फाटक शनिवारी (दि. 19) आणि रविवारी (दि. 20) बंद राहणार आहे. अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने दिली आहे.

मध्य रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जात आहेत. ज्या ठिकाणी काम केले जात आहे, त्या दरम्यानचे रेल्वे फाटक अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंद ठेवण्यात येते. लोणवळा ते पुणे या मार्गावर रेल्वेची सध्या देखभाल आणि दुरुस्तीची कामे सुरु आहेत.

कामशेत-तळेगाव स्थानकाच्या दरम्यान असलेले कान्हे फाटक (फाटक क्रमांक 45) शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सायंकाळी सहा या कालावधीत बंद राहणार आहे. दरम्यान नागरिकांसाठी जांभूळ गेटचा पर्याय वाहतुकीसाठी उपलब्ध असणार आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.