मंगळवार, जानेवारी 31, 2023

Pune news : पुणे रेल्वे स्टेशन लेन क्रमांक चार येथून पीएमपीएमएल ची बस सेवा उद्यापासून पूर्ववत

कोरोना काळात बंद झालेली सेवा पूर्ववत

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे स्टेशन लेन क्रमांक चार येथून (Pune news) पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड ( पीएमपीएमएल) ची बस सेवा उद्यापासून पूर्ववत करण्यात येत आहे.

उद्या बुधवार 30 नोव्हेंबर 2022 पासून पुणे रेल्वे स्टेशन येथे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल कडून पुणे स्टेशन (मोलेदिना बस स्थानक) येथून सुटल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन येथील लेन क्रमांक चार येथे प्रवासी चढ-उतार करून नियमित मार्गाने संचलनात राहणार आहेत.

मार्ग क्रमांक : मार्ग पासून – पर्यंत

57: पुणे स्टेशन ते वडगाव/ वेणूताई

144: पुणे स्टेशन ते एनडीए गेट नंबर 10

140: पुणे स्टेशन ते अप्पर डेपो

333 ( बी.आर.टी ): पुणे स्टेशन ते हिंजवडी

158: मनपा भवन ते डी वाय पाटील कॉलेज

163( बी.आर.टी ): पुणे स्टेशन ते खराडी, ढोले पाटील कॉलेज

312 ( बी.आर.टी ): पुणे स्टेशन ते चिंचवडगाव

158: मनपा भवन ते डायमंड वॉटर पार्क दादाजी पडळ

Pune News : हजारो वर्षे परंपरा असलेला वासुदेव का आणला जात नाही : डॉ. भावार्थ देखणे

पुणे रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारासमोरील लेन क्रमांक चार मधून पीएमपीएलच्या बसेसचे संचलन सुरू होते. मात्र कोरोना काळापासून सदरचे संचलन बंद झाले होते.(Pune News) ते बस संचलन पूर्ववत सुरू होत असल्याने ये- जा  करणाऱ्या प्रवाशांना किफायतशीर दरात सुरक्षित सेवा उपलब्ध होणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रवासी नागरिकांनी या बस सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.

Latest news
Related news