सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Pune Gambling raid: पुणे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यांवर छापा 19 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पुणे स्टेशनजवळील बस स्टॉपच्या पार्कींगमधील फुटपाथवर जुगार खेळणाऱ्यावर पोलिसांनी गुरुवारी (दि.11) कारवाई केली. (Pune Gambling raid) ही कारवाई तुकाराम शेठ शिंदे पीएमटी बस स्टॉपच्या पार्कींगमधील फुटपाथवर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी 10 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला केला आहे.

BJP: भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

रायटर उस्मान सुलेमान मुल्ला (वय.47 रा. अक्कलकोट) व संदिप भगवान गायकवाड (वय40 रा.कॅम्प) यांच्यासह 19 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.(Pune Gambling raid) यातील अकरा जणांना पोलिसांनी अटक केली असून 8 जण फरार झाले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 हजार 970 रुपये रोख व 8 हजार रुपये किंमतीचा फोन व जुगाराचे साहित्य असा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी सर्व आरोपींवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

 

spot_img
Latest news
Related news