Pune Rain : 9 ऑगस्टपर्यंत पुण्यातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज : गेल्या महिन्यात (Pune Rain) पडलेल्या मुसळधार पावसाने मध्ये विश्रांती घेऊन पुन्हा एकदा बरसायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाकडून 7 ऑगस्टच्या दुपारपासून 9 ऑगस्टपर्यंत पुणे घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या घाट भागात प्रवास टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच या जोरदार पावसाची शक्यता ताम्हिणी, कुंडेलिका, मुळशी, लोणावळा, खंडाळा परिसरात वर्तवण्यात आली आहे. तर हा पाऊस एकूण 3 दिवस 500-600 मिमी ओलांडू शकणार आहे. तर पुणे शहरात 8 ऑगस्ट ते 9 ऑगस्टपर्यंत 35 मिमी ते 45 मिमी/दिवस असा हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. गेले काही दिवस पुणे शहर व परिसरात पावसाने विश्रांती घेतली होती. मध्येच एखादी पावसाची सर येत होती. गेल्या 24 तासांत भाेरमध्ये 44.5 मिमी पावसाची नोंद झाली असून लवासा 27.5, राजगुरुनगर 12, नारायणगाव 10.5, लोणावळा 5 मिमी पाऊस झाला आहे. अन्य ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे.

TET Exam Scam : धक्कादायक! TET परीक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावे समोर

गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्याने (Pune Rain)  पुण्यातील धरणांमधील पाणीसाठा फार कमी झाला आहे. असाच पाऊस चालू राहिला, तर यंदा पाणी साठा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.