Pune : पुणे शहरातून पाऊस गायब; दमदार पावसाची प्रतीक्षा

Rain disappears from Pune city; Waiting for heavy rain : पुणे शहरातून पाऊस गायब; दमदार पावसाची प्रतीक्षा

एमपीसी न्यूज – आज येणार, उद्या येणार म्हणून सध्या पुण्यातून पाऊस गायबच झाला आहे. जून महिन्यात जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलैमध्ये दांडी मारली आहे. मागील 2 – 4 दिवसांपासून रोज काळेकुट्ट ढग दाटून येत आहेत. पण, पाऊस काही पडत नाही. त्यामुळे पुणेकरांना चिंता सतावत आहे.

शहर परिसरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी येतात. त्यानंतर पाऊस गायब होऊन अचानक ऊन पडते, असे वातावरण सध्या पुण्यात अनुभवायला मिळत आहे. हवामान खात्यातर्फे जोरदार पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पण, हा पाऊस कधी पडणार, अशी विचारणा होत आहे.

दरवर्षी जुलै महिन्यात धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सध्या जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपत आला आहे. तरी दमदार पावसाचा पत्ताच नाही.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांची एकूण क्षमता 29. 15 टीएमसी आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.

कोरोनाच्या संकट काळात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा खालावत चालला आहे.

धरणातील पाणीसाठ्याच्या टक्केवारीनुसार दि. 31 जुलै पर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like