Pune: पुण्यात पाऊस गायब; जुलै महिन्यात दमदार पावसाची आशा

Pune: Rain disappears in Pune; Now expect heavy rains in July जोरदार पाऊस होणार असल्याचे वातावरण निर्माण होते. पण, पाऊस काही होत नाही. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. थोडासा शिडकावा झाल्यानंतर पाऊस गायब होतो.

एमपीसी न्यूज- जून महिना संपत आला तरी पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावली नाही. त्यामुळे आता जुलै महिन्यात दमदार पावसाची गरज आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे.

सध्या या धरणांत केवळ 5.47 टीएमसी पाणीसाठा आहे. दिनांक 31 जुलै 2020 पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील 2 ते 3 दिवसांपासून आकाशात काळेकुट्ट ढग दाटून येतात.

जोरदार पाऊस होणार असल्याचे वातावरण निर्माण होते. पण, पाऊस काही होत नाही. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. थोडासा शिडकावा झाल्यानंतर पाऊस गायब होतो. कोरोनाच्या संकट काळात पाण्याचा वापर जास्त प्रमाणात वाढला आहे.

त्यामुळे मागील वर्षीसारखी यावर्षीही धरणे 100 टक्के भरण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरवर्षी क्षेत्रात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत दमदार पाऊस होत असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येते.

खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चारही धरणांची एकूण क्षमता 29.15 टीएमसी आहे. त्यासाठी धरण क्षेत्रात जोरदार पावसाची गरज आहे.

मात्र, सध्या पावसाने पुण्याकडे पाठ फिरविली आहे. जून महिन्यात सुरुवातीला काही दिवस पावसाने हजेरी लावली. नंतर मात्र पाऊस गायबच झाला.

यावर्षी कोरोनाचे भयानक संकट निर्माण झाले आहे. त्यात पिण्याच्या पाण्याचे निर्माण होऊ नये, असे पुणेकरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा सध्या काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.