Pune : दिवसभरच्या उकाड्यानंतर सायंकाळी पाऊस!

एमपीसी न्यूज – मंगळवारी दिवसभर पुणेकरांना उकाडा जाणवत होता. त्यामुळे नागरिक घामाघूम झाले होते. सायंकाळी 5 वा. पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वातावरणात गारठा निर्माण झाला होता.

सिंहगड रस्ता, वडगांव, धायरी, नऱ्हे, वारजे – माळवाडी, कर्वेनगर, शिवणे परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. मातीला सुगंध सुटला होता. त्यामुळे या प्रथम पावसाची पुणेकरांनी घरात बसूनच अस्वाद घेतला. ढगांचा गडगडाट होत असल्याचे चित्रही दिसून आले.

दरम्यान, वातावरण बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यातही पावसाचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक भागात वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

वातावरण बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी पुढील पाच दिवस पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यातही ही पावसाचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्याच बरोबर अनेक भागात वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.