Pune : पुणे शहरात पाऊस

एमपीसी न्यूज- पुणे शहरात आलेल्या पूर परिस्थितीच्या संकटानंतर नागरिक स्वतःला सावरत असतानाच आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा पुणेकर धास्तावले आहेत.

पुण्यात मागील आठवडाभरापासून ऊन सावलीचा खेळ सुरु आहे.सकाळच्या वेळेत निरभ्र असलेले आकाश दुपारी ढगांच्या दाटीने झाकोळून जात होते. परंतु पाऊस पडत नसल्यामुळे हवेत किंचित उकाडा देखील वाढला होता. त्यात आज दुपारी ढगांचा गडगडाट होऊन दीडच्या सुमारास पुणे शहर परिसरात पावसाला सुरुवात झाली. एक मोठी पावसाची सर येऊन गेली असून संततधार सुरु आहे. पिंपरी चिंचवड परिसरात ढगाळ वातावरण पसरले असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार कमाल 30 तर किमान 20 अंश सेल्सियस तापमान राहणार असून 7 ऑक्टोम्बरपर्यंत ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.