Pune Rain Update : पुण्यात कालपेक्षा आज जास्त पावसाची शक्यता; नागरिकांचा ट्विटरवर पाऊस

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने (Pune Rain Update) संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढले आहे. कालपेक्षा आज पुण्यात जास्त पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच पुणेकरांनी ट्विटरवर ट्विट करून ट्विटचा पाऊस पाडला आहे. सतर्क नागरिक जागरुकतेचा इशारा देत असून संतप्त नागरिक प्रशासनावर संताप व्यक्त करत आहेत. तर, काहीजण या पावसाचा व्हिडिओ पोस्ट करून परतीच्या पावसाचा आनंद घेत आहेत. तर पाहूया काय म्हणत आहेत पुणेकर. 

1. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेत उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांवर संशोधक असणारे विनीत कुमार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे, की skewT चार्ट विश्लेषण आणि IMD-GFS च्या अंदाजानुसार आज पुण्यात पावसाची शक्यता कालच्या तुलनेत जास्त आहे. पुण्यातील अनेक भागात 20-25 मिमी पावसाची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. बाणेर, औंध, सुस, पाषाण, वाकड, हिंजवडी, बावधन, IISER, पुणे विद्यापीठ, NCL येथे जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हंटले (Pune Rain Update) आहे.

2. पुण्यातून थंडगार पाऊस पडत असल्याचे लोगेश यांनी म्हंटले असून त्यांनी घाटात आपली गाडी पार्क करून पावसाचा आनंद घेताना ते दिसत आहेत.

3. पुणे जिल्ह्याच्या दक्षिण-मध्य भागात ढगांची उपस्थिती दर्शवणारी RADAR प्रतिमा मीनाक्षी गुरव यांनी प्रसिद्ध केली आहे. त्यांनी आज हलक्या पावसाची अपेक्षा आहे असे म्हंटले आहे.

4. नुकत्याच झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जवळपास सर्वच रस्त्यांवरील अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. नियमित मार्ग बंद झाले आहेत. आशा आहे की हा ‘ऑक्टोबर’ मान्सूनचा शेवटचा असेल असे अमर बर्वे यांनी म्हंटले आहे.

5. काही वेळापूर्वीच नांदेड सिटीमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाल्याचे सत्यजीत यांनी ट्विटच्या माध्यमातून कळवले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.