Pune Dams: खडकवासला व मुळशी धरणातून विसर्ग वाढवला

एमपीसी न्यूज : पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे सध्या खडकवासला व मुळशी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून काल सायं.(Pune Dams) 8 वाजता 10 हजार 246 क्यूसेक करण्यात आला. तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून रात्री 9 वाजता विसर्ग वाढवून 15 हजार क्युसेक करण्यात आलेला आहे. शहरात पडत असलेल्या पावसामुळे पानशेत आणि वरसगाव धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

पुण्यात धरण परिसरात पावसाची संतंत धार ही सुरच आहे. यामुळे खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरण हे 100 टक्के भरले आहे. यामुळे, वरसगाव धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा २ हजार ३४६ क्यूसेक विसर्ग वाढवून सायं. 7 वाजता 5 हजार 710 क्यूसेक करण्यात आला.

Today’s Horoscope 20 August 2022- जाणून घ्या आजचे राशिभविष्य

तर, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून सायं. 7 वाजता 8 हजार 560 क्यूसेक करण्यात आला होता. (Pune Dams) तसेच दुपारी 3 वाजता 6 हजार 848 क्यूसेक विसर्ग करण्यात आलेला होता.  मात्र रात्री 8 वाजता हा विसर्ग वाढवून 10 हजार 246 क्यूसेक करण्यात आला. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक अभियंता यो.स.भंडलकर यांनी केले आहे.

तर मुळशी धरणाच्या सांडव्यावरून रात्री 9 वाजता विसर्ग वाढवून 15 हजार क्युसेक करण्यात आलेला आहे. आवश्यकतेनुसार मुळशी धरणाच्या सांडव्यावरून विसर्गामध्ये बदल संभवू शकतो.(Pune Dams) असे बसवराज मुन्नोळी, टाटा पॉवर यांनी सांगितले आहे. यापुर्वी मुळशी धरणाच्या सांडव्यावरून रात्री 8 वाजता विसर्ग वाढवून 10 हजार 560 क्युसेक करण्यात आलेला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.