Pune : राज ठाकरे सभेतून मोदींचा पर्दाफाश करतायत -पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज- आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पर्दाफाश होत आहे. या सभांचा फायदा किती झाला हे निवडणुकीनंतर समजेल अशा शब्दात काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेची पाठराखण केली.

काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

यावेळी पुणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार मोहन जोशी, शहर अध्यक्ष रमेश बागवे तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.