Pune : राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची घेतली भेट

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तर यावेळी त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्येतबाबत चौकशी केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहे. तर, याच दरम्यान राज ठाकरे यांनी पुण्यातील पर्वती येथे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यात चर्चा देखील झाली. मात्र, या भेटीबाबत राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले.

  • तसेच या भेटीबाबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, ठाकरे कुटुंबाशी सुरुवातीपासून जिव्हाळ्याचे संबध आहेत. त्यांच्या कुटुंबातील व्यक्ति पुण्यात आला की माझी भेट होत असते. तर राज ठाकरे हे पुण्यात आल्यावर आज मला भेटण्यास आले. त्यांनी माझ्या तब्येती बदल विचारपूस केली असून राज ठाकरे हे नेहमी भेटण्यास येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.