Pune : राज ठाकरे यांची पुण्यात 18 तारखेला सभा; मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांची माहिती 

एमपीसी न्यूज- सत्ताधारी भाजपच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पुण्यात गुरुवारी 18 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी दिली आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात सत्ताधारी भाजपवर कडाडून हल्ला चढवला होता. सत्ताधारी भाजपच्या कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्रात जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले होते. त्यानुसार पुण्यात गुरुवारी 18 एप्रिल रोजी सिंहगड रस्त्यावर मुठा कालव्याजवळ संध्याकाळी 7 वाजता राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.
  • राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आघाडीला फायदा होईल असे बोलले जात आहे. पण किती फायदा झाला हे निवडणुकीनंतर समजेल असे आघाडीतील नेत्याकडून सांगितले जात आहे.या सभेत राज ठाकरे नेमके  कोणत्या मुद्द्यांना हात घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.