Pune : राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर; आजपासून संवाद शिबिर

एमपीसी न्यूज- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज, शुक्रवार व शनिवार दोन दिवस संवाद शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिरात पक्ष बांधणीसह इतर विषयावर राज ठाकरे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.

आज शुक्रवार आणि उद्या शनिवारी कात्रज येथे मनसेच्या राज्यातील जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांचे शिबिर पार पडणार असून या शिबिरात पक्ष बांधणीसह इतर विषयावर राज ठाकरे कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत. तर उद्या शनिवारी डेक्कन जिमखाना येथे सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मोबाईल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.