Pune : ‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप 

Rajendra Jagtap as Chairman and Managing Director of PMPML : राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जगताप यांना नियुक्ती पत्र दिले.

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी राजेंद्र जगताप यांची राज्य शासनातर्फे शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जगताप यांना दिले आहे. दरम्यान, नयना गुंडे यांच्याकडून त्वरित कार्यभार स्वीकारा, असेही कुंटे यांनी पत्रात म्हटले आहे.

राजेंद्र जगताप यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. या कालावधीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राबविले.

आता त्यांना ‘पीएमपीएमएल’ च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

मागील अनेक वर्षांपासून या खात्याला पूर्णवेळ अधिकारी नव्हता. ती गरज आता शासनाने पूर्ण केली आहे. कोरोनाच्या संकट काळात सध्या पीएमपीएमएल बंदच आहे.

कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी जगताप यांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

तसेच ‘पीएमपी’त कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढविणे हे त्यांच्या समोर मोठे आव्हान आहे.

तुकाराम मुंडे यांनी या खात्याची जबाबदारी घेतली असताना अनेक सुधारणा केल्या होत्या. तशाच सुधारणा जगताप यांच्या कार्यकाळात होणार का, याची पुणेकरांना उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.