Pune : चंद्रकांत पाटील यांचा विरोधात लढण्याचा राजू शेट्टी यांचा बार फुसका

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिथून निवडणूक लढविणार, त्यांचा विरोधात आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले होते. पाटील यांना भाजपने कोथरूड मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर ‘एमपीसी’ न्यूजच्या प्रतिनिधीने शेट्टी यांच्याशी संपर्कात साधला असता ग्रामीण भागातून चंद्रकांत पाटील निवडणूक लढले असते, तर त्यांचा विरोधात निवडणूक लढविली असती, अशी सारवासारव शेट्टी यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांना भाजपने कोथरूड मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. पाटील जिथून निवडणूक लढविणार, त्यांचा विरोधात आपण निवडणूक लढविणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले होते. त्याबाबत ‘एमपीसी’ न्यूजच्या प्रतिनिधीने शेट्टी यांच्याशी संपर्कात साधला. ‘आता आपण पाटील यांचा विरोधात कोथरूड मतदारसंघातुन निवडणूक लढविणार का?’ या प्रश्नावर ‘ग्रामीण भागातून चंद्रकांत पाटील निवडणूक लढले असते, तर त्यांचा विरोधात निवडणूक लढविली असती’ अशी सारवासारव शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढण्याचा राजू शेट्टी यांचा बार फुसका ठरला आहे.

येत्या काळात चंद्रकांत पाटील हेच पुण्याचे नेतृत्व करणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. एकप्रकारे बापट यांचे राजकीय वजन कमी करण्याचा हा डाव असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, कोथरूडकर सध्या चंद्रकांत पाटील यांचा विरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. आम्हाला स्थानिक उमेदवार हवा, अशी मागणी जोर धरत आहे. तसे फलकही झळकले आहेत. विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक किशोर शिंदे, शाम देशपांडे या स्थानिक उमेदवारांना तिकीट देण्याची मागणी करण्यात येत आहे. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीची सुट्टी आहे. 3 आणि 4 ऑक्टोबर ला विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.