Pune : राम बांगड ,राम बोरकर ,स्वप्नील नाईक यांना नागरी गौरव सन्मान

एमपीसी न्यूज- ‘शिवप्रजाराज्यम ‘,’ग्रीन रिव्हॉल्युशन ‘ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या नागरी गौरव सन्मान सोहळ्यामध्ये राम बांगड (रक्तमहर्षी गौरव सन्मान ), राम बोरकर (लोकसेवक गौरव सन्मान ), स्वप्नील नाईक (युवा गौरव सन्मान ) यांचा सन्मान करण्यात आला.

खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान झाला. महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे व्यवस्थापक सुरेश कोते आणि एड. प्रतापसिंह परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

‘रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आहे ,आणि महाराष्ट्रात पुणे प्रथम स्थानावर आहे ,कारण कार्यकर्ते आणि संस्थांचे मोहळ पुण्यात आहे. पुण्याने अन्य वैशिष्ट्यांप्रमाणे हेही वैशिष्ट्य जपून ठेवावे. कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्याचा सन्मान करण्याची ही प्रथा अनोखी असून कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी समाजाने पुढे येऊन कायमस्वरूपी व्यवस्था उभारायला हवी ‘,असे उद्गार खासदार वंदना चव्हाण यांनी यावेळी बोलताना काढले.

‘रक्ताचे नाते’ संस्थेचे राम बांगड ,मनसे उपाध्यक्ष राम बोरकर ,स्वप्नील नाईक यांनी समाजकार्यातील अनुभव सांगितले .

‘शिवप्रजा राज्यम’ चे अध्यक्ष अनंत घरत ,’ग्रीन रिव्होल्यूशन ‘ चे अध्यक्ष किशोर रजपूत यांनी स्वागत केले. निमंत्रक ललित राठी यांनी आभार मानले. ‘वनराई’ चे मुकुंद शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बबलू जाधव, व्यापारी महासंघाचे सचिन निवंगुणे, युवक क्रांती दल शहराध्यक्ष सचिन पांडुळे, अप्पा अनारसे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.