Pune : शिवप्रजाराज्यम’,’ग्रीन रिव्हॉल्युशन’ तर्फे शुक्रवारी नागरी गौरव सन्मान सोहळा

राम बांगड, राम बोरकर,स्वप्नील नाईक यांचा सन्मान

एमपीसी न्यूज- ‘शिवप्रजाराज्यम ‘,’ग्रीन रिव्हॉल्युशन ‘ तर्फे 23 ऑगस्ट रोजी नागरी गौरव सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून राम बांगड (रक्तमहर्षी गौरव सन्मान ),राम बोरकर (लोकसेवक गौरव सन्मान ), स्वप्नील नाईक (युवा गौरव सन्मान ) यांचा सन्मान होणार आहे.

खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा होणार असून महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे व्यवस्थापक सुरेश कोते आणि एड. प्रतापसिंह परदेशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे उद्या शुक्रवारी (दि. २३) संध्याकाळी साडेचार वाजता आयोजित केला आहे .

शिवप्रजा राज्यम ‘चे अध्यक्ष अनंत घरत ‘ग्रीन रिव्होल्यूशन ‘चे अध्यक्ष किशोर रजपूत आणि निमंत्रक ललित राठी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.