Pune : वंचित घटकातील 1200 मुलांनी लुटला धुळवडीचा आनंद

एमपीसी न्यूज- कै शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने खास वंचित घटकातील मुलांसाठी आयोजित ‘रंग बरसे’ या रंगोत्सवामध्ये १२०० मुलांनी सहभाग घेऊन धुळवडीचा आनंद लुटला.

कै शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा रंगोत्सव आयोजित केलं जात असून यंदा या रंगोत्सवाचे २४ वे वर्ष होते. या रंगोत्सवामध्ये ऊसतोडणी कामगारांची मुले, देवदासींची मुले, अनाथ, अंध, मूकबधिर तसेच रस्त्यावर फुगे विकणारी, डोंबाऱ्याचा खेळ करणारी तसेच विविध सामाजिक संस्थांमधील 1200 मुले सहभागी झाली होती.

ठेका धरायला लावणारी गाणी सोबत रंगांची मनसोक्त उधळण करीत ही मुले सप्तरंगामध्ये अक्षरशः न्हाऊन निघाली. या मुलांच्या चेहऱ्यावर होळी साजरी केल्याचा आनंद दिसून आला. या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विभागाचे सहसचिव लालसिंग गुजर, सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, अप्पर पोलीस आयुक्त अनिल फुलारी आदी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.