BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दोन सख्ख्या बहिणीवर शेजारी राहणाऱ्या इसमाने केले लैंगिक अत्याचार

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- दोघा सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर शेजारीच राहणाऱ्या एका इसमाने लैंगिक अत्याचार केले. ही घटना मंगळवारी ( दि. १९) दुपारी पुण्यात सुतारदार परिसरात घडली. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पीडित मुलींची आई मोलकरणीचे काम करते. मंगळवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे कामाला गेली असता शेजारीच राहणाऱ्या इसमाने घरात कोणी नसल्याची संधी साधून तीन आणि पाच वर्षाच्या दोघा सख्ख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले.

घडलेली सर्व घटना पीडित मुलींनी संध्याकाळी काम आटोपून घरी आलेल्या आईला सांगितली. आईने त्वरित कोथरूड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी फरार असून पोलीस तपास सुरु आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
.