Pune : तरुणीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार जाणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज- खोटे कारण सांगून तरुणीला निर्जन ठिकाणी घेऊन जात तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी सायंकाळी पिसोळी परिसरातील एका डोंगरावर घडली.

कृष्णा बबन जाधव आणि अक्षय चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पीडित तरुणीचे मित्र आहेत. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या पीडित तरुणीला खोटे कारण सांगून आरोपींनी तिला घराबाहेर काढले. त्यानंतर आरोपींनी तिला गाडीवर बसवून उंड्री येथे नेले. त्याठिकाणी एका दारूच्या दुकानातून दारूची बाटली विकत घेतली. त्यानंतर पीडित तरुणीला पिसोळी परिसरातील एका डोंगरावर नेले तिथे तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला.

कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.