Pune : कोथरूडमध्ये रॅपिड अँटीजेन टेस्टचे सुविधा केंद्र सुरू : पृथ्वीराज सुतार

Rapid Antigen Test Facility Center started in Kothrud: Prithviraj Carpenter;अर्ध्या तासात निदान शक्य

एमपीसी न्यूज – कोथरूड भागातील रुग्णांच्या कोविड-१९ च्या चाचणीचे रिपोर्ट त्वरीत मिळावेत व पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रित होण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्टचे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी दिली.

कोथरूड येथील कै. अण्णासाहेब पाटील शाळेमध्ये ही टेस्ट होणार आहे. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते दिनेश माथवड, सहाय्यक मनपा आयुक्त संदिप कदम, विभागीय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप मुळे, आरोग्य अधिकारी डॉ. अंजली टिळेकर, विभागीय आरोग्य निरीक्षक राम सोनवणे उपस्थित होते.

हे केंद्र सुरू करण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, डॉ. संजीव वावरे यांनी सहकार्य केले.

या रॅपिड अँटीजेन टेस्टमुळे केवळ अर्ध्या तासात रुग्णांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह याचे निदान होणार आहे. कोथरूडकारांसाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची असल्याचे पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून कोथरूमध्ये रुग्ण झपाट्याने वाढत आहे. यापूर्वी कोरोना टेस्ट करण्यासाठी व निदान होण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागत होता.

आता  टेस्टिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरीकांनीही समाधान व्यक्त केले. पुणे महापालिकेतर्फे जास्तीत जास्त कोरोना टेस्ट करण्यावर भर देण्यात येत आहे.

त्यामुळे तातडीने रुग्णांनावर उपचार करून इतर नागरिकांना कोरोना होण्यापासून रोखता येते. त्यासाठी या टेस्ट अत्यंत महत्वपूर्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like