Pune : सिंहगड रोडवरील नागरिकांना उद्यापासून रॅपिड टेस्टची सुविधा – प्रसन्न जगताप

Rapid test facility for citizens on Sinhagad Road from tomorrow - Prasanna Jagtap

एमपीसी न्यूज – सिंहगड रोडवरील नागरिकांसाठी रविवार (दि. १२ जुलै) पासून सिंहगड कॉलेज येथील कोरोना केअर सेंटर वरती सोशल डिस्टन्सिंग पाळून रॅपिड टेस्ट (ऐंटीजिन टेस्ट) चालू करणेत येत आहे, अशी माहिती माजी उपमहापौर आणि नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी दिली.

कोरोना संशयीत नागरिकांना ही टेस्ट करुन घेता येईल. या टेस्टचा रिझल्ट एक तासात कळणार आहे. कोणाला टेस्ट करून घ्यायची असेल त्यांनी अवश्य जावे. तसेच आपल्या नातेवाईक व मित्रपरिवाराला सुध्दा काही संशय वाटत असेल तर टेस्ट करुन घेण्यास निश्चित सांगावे. जेणेकरून आपल्या भागातील रुग्णांची संख्या नियंत्रित राखणेस मदत होऊ शकेल.

संपूर्ण सिंहगडरोड परिसरातील (हिंगणे खु, विठ्ठलवाडी, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव, वडगाव खुर्द, नर्हे, आंबेगाव, खडकवासला व बाकी सर्व परिसर ) नागरिकांसाठी ही तपासणी उपलब्ध आहे.

अधिक माहीतीसाठी

अँड. प्रसन्नदादा घ. जगताप – ९८२२०२२९५०

सुरेश देशमुख – 9689944748

किशोर कुलकर्णी – 744 764 7071

राहूल जोशी – 788 810 5469

संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.