Pune : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रशीद शेख यांची महापालिकेला एक लाखाची मदत

एमपीसी न्यूज – कोरोनाचा पार्श्वभूमीवर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख यांनी महापालिकेला एक लाखाची मदत केली. त्याबद्दल महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी शेख यांना पत्र देऊन आभार मानले. यावेळी नगरसेवक रफिक शेख उपस्थित होते.

संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरात या रोगाने हाहाकार माजवला आहे. हे संकट रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन आणि पुणे महापालिकेच्या प्रशासकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर अहोरात्र राबविण्यात येत आहे. प्रशासकीय सर्व पातळ्यांवर काम चालू असले तरी आपल्या सारख्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्ती महत्वपूर्ण आहेत.

आपण दिलेल्या मदतीबद्दल मी आपला आभारी असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी रशीद शेख यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपल्या सारख्या व्यक्तीने सहकार्य मिळाल्याने प्रशासन किंवा शासन यंत्रणेस निश्चितच एक प्रकारची ऊर्जा मिळाली आहे. या राष्ट्रीय आपत्तीवर मात करण्यासाठी तुम्ही मोलाचे सहकाऱ्याचा हात पुढे केला, असेही आयुक्तांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.