BNR-HDR-TOP-Mobile

Pune : रसिक मित्र मंडळ’च्या ‘ ईद मिलन मुशायरा’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

एमपीसी न्यूज- उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती या मधूर भाषाभगिनींना ईदचे औचित्य साधून शिरखुर्म्याच्या खुमारीसह एकत्र करणाऱ्या ‘ रसिक मित्र मंडळ ‘ च्या ‘ ईद मिलन मुशायरा’ ला चांगला प्रतिसाद मिळाला. पत्रकार भवनच्या सभागृहात सोमवारी सायंकाळी ६ वाजता या निमंत्रित कवींच्या मुशायराचे आयोजन करण्यात आले होते.

एस.एस. राही, रहिमा पटेल, सीमा शर्मा, शायर इसामुद्दीन शोला, हेमंत सीमंत, हेमंत पुणेकर, हरिवल्लभ शर्मा, सुधीर कुबेर, शमसाद टाकेदार, मुमताझ पीरभॉय, रफिक काझी, नझीर फतेहपुरी यांनी बहारदार रचना सादर केल्या.

डॉ. अनीस चिश्ती, मुनवर पिरभॉय, मुमताझ पीरभॉय उपस्थित होते. सुरेशचंद्र सुरतवाला, रफीक काझी, प्रदीप निफाडकर यांनी आयोजन केले. उर्दू, हिंदी, मराठी, गुजराती अशा चार भाषातील १० कवींनी मुशायऱ्यात भाग घेतला. शेवटी सर्वांनी रसिकांसमवेत शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला.

.