Pune : नगरसेवक रवींद्र धंगेकर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हजर

अतिरिक्त आयुक्त मारहाण प्रकरण

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेले काँग्रेसचे नगरसेवक रवींद्र धंगेकर आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाले. न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांच्या न्यायालयाने काल त्यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता.

महापौर मुक्ता टिळक यांच्या कक्षात सोमवारी झालेल्या आंदोलनादरम्यान अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि विरोधी पक्षाचे नगरसेवक यांच्यात ‘तू तू मै मै’ झाली होती. यावेळी निंबाळकर यांना मारहाण झाली होती. त्यानंतर याप्रकरणी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक रवींद्र धंगेकर आणि आणखी काही कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.