Pune: महावितरणच्या वित्त संचालकपदी रवींद्र सावंत रुजू

Pune: Ravindra Sawant has been appointed as the Finance Director of MSEDCL सावंत यांनी नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक (वित्त), महानंदचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधानभवन उपसचिव तथा वित्त नियंत्रण म्हणून मुंबई येथे काम पाहिले आहे.

एमपीसी न्यूज- महावितरणचे नवीन संचालक (वित्त) म्हणून रवींद्र सावंत यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. याआधी ते एमआयडीसीचे मुख्य वित्त व लेखाधिकारी म्हणून कार्यरत होते.

संचालक (वित्त) रवींद्र सावंत हे कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द (जि.सांगली) येथील मूळ रहिवासी असून कोल्हापूर विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र या विषयातील पद्व्युत्तर पदवी संपादन केली आहे.

यापूर्वी सावंत यांनी नॅशनल हेल्थ मिशनचे संचालक (वित्त), महानंदचे व्यवस्थापकीय संचालक आणि विधानभवन उपसचिव तथा वित्त नियंत्रण म्हणून मुंबई येथे काम पाहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.