_MPC_DIR_MPU_III

Pune : महापालिका आरोग्य विभागाच्या 177 पदांसाठी सोमवारपासून भरती : महापौर

प्रथम श्रेणीच्या120, तर द्वितीय श्रेणीच्या 57 जागा

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागासाठी प्रथम श्रेणीतील 120, तर द्वितीय श्रेणीतील 57 पदांसाठी सोमवारपासून भरती सुरु करण्यात येणार आहे. या 177  रिक्त पदांसाठी आॅनलाइन परीक्षा घेऊन सरळसेवा पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़. या संदर्भात शुक्रवारी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन तसेच शासनाचे निकष पाळून गुणवत्तेच्या आधारावर पद भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरु करणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेने रिक्त पदांच्या भरतीच्या परवानगीसाठी राज्य शासनाकडे 8  नोव्हेंबर 2017  रोजी प्रस्ताव सादर केला होता. कोरोना प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने आरोग्य विभागातील एकूण 1  हजार  86 रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुरावा केला होता. त्यावर शासनाने 20  मार्च रोजी सदर रिक्त पदे भरण्यास काही अटींच्या अधीन राहून मान्यता दिली आहे.

 

‘सोमवारपासून ही भरती प्रक्रिया सुरु होणार असून, ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. महानगरपालिकेचा खर्च हा एकूण आस्थापना खर्चाच्या 35 % पेक्षा कमी असला पाहिजे, ही अट राज्य सरकाने घातली आहे. त्यानुसार ही भरती प्रक्रिया पूर्ण करत आहोत. तसेच वित्त विभागाच्या धोरणानुसार तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व पदे नियमितरित्या भरण्याऐवजी सहजरित्या जी कामे बाह्ययंत्रणेकडून करून घेणे शक्य असेल, अशी कामे बाह्ययंत्रणेकडून करून घेण्यात यावीत, असेही राज्य सरकारने म्हटले आहे.  177  जागा भरल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग आणखी सक्षम होणार असून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मोठी साथ मिळणार आहे’. मुरलीधर मोहोळ : महापौर.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.