Maharashtra : राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू ,72 हजार पदांची भरती

एमपीसी न्यूज – राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 72 हजार पदांची भरती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होण्याची शक्यता आहे.  मुख्य सचिवांनी मंत्रालयात आढावा बैठक घेतली.  फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार असून पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार आहेत.
प्रत्येक विभागनिहाय भरती होणार असून प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांच्या क्षेत्रीय स्तरावरील सुमारे 72 हजार पदांच्या भरती कार्यवाहीचा मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी आज आढावा घेतला.
सध्या बिंदूनामावली तपासणीचे काम सुरु असून त्यानंतर या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.