Pune: खडकवासला मतदारसंघात वाढीव वीजबिल कमी करून द्या- भीमराव तापकीर

Pune: Reduce the increased electricity bill in Khadakwasla constituency- Bhimrao Tapkir सध्या अनेक लोकांना बिले वाढून आल्याने जनता हवालदिल झाली आहे. अनेकांना नेहमी येणारे बिलापेंक्षा दुप्पट - तिप्पट बिल वाढीव रकमेची आली आहेत.

एमपीसी न्यूज- खडकवासला मतदारसंघात नागरिकांना भरमसाठ वीजबिल आकारण्यात आले आहेत. ते कमी करून द्यावे, अशी मागणी आमदार भीमराव तापकीर यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात गेल्या ३ महिन्यांपासून संपूर्ण भारत लॉकडाऊन सुरु आहे. माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. या काळात महाराष्ट्र राज्याच्या तिघाडी सरकारचे महावितरण खाते जनतेला दिलासा द्यायचे सोडून भरमसाठ (ॲानलाईन) बिले देण्यात मग्न आहे.

ही बिले कमी करून द्यावीत, बिल भरण्यासाठी कालावधी दिला जावा, यासाठी आमदार भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी वारजे – माळवाडी भाजपच्यावतीने महावितरणचे वारजे उपविभाग अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील गवळी महावितरण यांना निवेदन देण्यात आले.

सध्या अनेक लोकांना बिले वाढून आल्याने जनता हवालदिल झाली आहे. अनेकांना नेहमी येणारे बिलापेंक्षा दुप्पट – तिप्पट बिल वाढीव रकमेची आली आहेत. कोरोनामुळे सध्या कामधंदे सगळेच बंद असल्याने ही बिले एकदम भरणे शक्य नाही.

या रकमेचे टप्पे करून मिळावेत, रिडींग दुरूस्त करून त्याप्रमाणे बिले देण्यात यावीत यासाठी मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी संपूर्ण मतदार संघातील पदाधिका-यांना सूचना केल्या.

मंगळवारी सकाळी ११ वाजता खडकवासला विधानसभा मतदार संघातील सर्व महावितरण कार्यालयात संबंधित अधिका-यांना आमदारांचे वतीने निवेदने देण्यात आली. याप्रसंगी किरण बारटक्के, सचिन दशरथ दांगट, दत्तात्रय चौधरी, वासुदेव भोसले, दत्तात्रय धुमाळ, संजय वाल्हेकर, ज्ञानेश्वर ठाकर, योगेश लिमये, भाऊ चौधरी ऊपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.