Pune : पुणे स्थानकावरील रेल्वेगाड्या आणि पीएमपी बसेसच्या फेऱ्या कमी करणार : विभागीय आयुक्तांची माहिती

एमपीसी न्यूज :   पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्या आणि पुणे शहरातील पीएमपीएमएलच्या बसेसच्या फेऱ्याही कमी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय पातळीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी पुण्यात आयोजित पत्रकरपरिषेद डॉ. म्हैसेकर यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांना थेट घरी सोडले जाणार नाही. त्यांचे विमानतळावरूनच क्वारंटाईन बंधनकारक करण्यात येणार  आहे.

त्याचबरोबर नियोजित वैद्यकीय शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या रेल्वेगाड्या आणि शहरातील पीएमपीएमएलच्या बसेसच्या फेऱ्याही कमी करण्यात येणार असल्याचे म्हैसेकर यांनी या वेळी सांगितले. गर्दी टाळण्यासाठी सर्व सेतू केंद्र आणि जमिनीची खरेदी विक्री होणारी निबंधक कार्यालये  उद्यापासून बंद करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.