Pune : मंगळ ग्रहावरील जलपर्णी काढण्याच्या प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या उलटा-पुलटा सभेत एक मताने मंजुरी

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उलटा-पुलटा सभे दरम्यान मंगळ ग्रहावरील जलपर्णी काढण्याचा प्रस्ताव एक मताने मंजूर आला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत दरवर्षी उलटा-पुलटा सभा घेण्यात येत असते. तर यंदा देखील आजच्या दिवशी उलटा-पुलटा सभा घेण्यात आली. या सभे दरम्यान अधिकारी लोकप्रतिनिधीच्या आणि लोकप्रतिनिधी अधिकारी वर्गाच्या भूमिकेत होते.

  • महापौर मुक्ता टिळक महापालिका आयुक्त, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक हे अतिरिक्त आयुक्त, नगरसेवक गोपाल चिंतल हे नगरसचिव, तर महापालिका आयुक्त सौरभ राव हे महापौरांच्या भूमिकेत होते. मंगळ ग्रहावरील जलपर्णी काढण्यात यावी, पुणे महापालिकेची मुख्य इमारत 99 वर्षाच्या कराराने भाडे तत्त्वावर देण्यात यावी. शहरात पे अँड पार्क योजना राबविताना त्याच्या वसुलीचे अधिकार नगरसेवकाना 99 वर्षाच्या करारवर देण्यात यावे, यासह शहराच्या दृष्टीने नऊ विषय मंजूर करण्यात आले आहे.

तर नेहमी सभागृहात लोकप्रतिनिधी हे अधिकारी वर्गाला शहराच्या प्रश्नावर धारेवर धरत असतात. तर आज या उलटा-पुलटा सभे दरम्यान अधिकारी वर्गाने लोकप्रतिनिधीची सुरेख भूमिका पार पाडत अनोख्या प्रश्नला हात घालत. उलटा-पुलटा सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

  • यावेळी नगरसचिव सुनील पारखी म्हणाले की, सभागृहात नेहमी अधिकारी विरुद्ध लोकप्रतिनिधी असे वातावरण पाहण्यास मिळते. पण, वर्धापन दिनाच्या निमित्ताने उलटा-पुलटा सभेत खेळीमेळीचे वातावरण पाहण्यास मिळाले असून या पुढील काळात असेच वातावरण सभागृहात असावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.