Pune : मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील रेल्वेसेवा 11 ऑगस्टपर्यंत ठप्प

एमपीसी न्यूज – पुणे, मुंबई शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. काही ठिकाणी दरड कोसळली आहे. तर, काही ठिकाणी रेल्वे रूळ खचले आहे. अशा ठिकाणी आता दुरुस्ती करण्यात येत असल्यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. यातील बऱ्याच रेल्वे गाड्या ह्या शुक्रवारपासून (दि.9) पासून ते रविवारपर्यंत (दि. 11 ऑगस्ट) रद्द करण्यात आल्या असल्याचे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईमधील मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

रद्द केलेल्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे :
11007 मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11008 पुणे-मुंबई डेक्कन एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
12126 पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
12125 मुंबई-पुणे प्रगती एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11139 मुंबई-गडाग एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11140 गाडग-मुंबई एक्सप्रेस 10.8.2019 ते 12.8.2019 पर्यंत.
11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11023 मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11024 कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11026 पुणे-भुसावळ एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पर्यंत.
11025 भुसावळ-पुणे एक्सप्रेस 9.8.2019 ते 12.8.2019 पर्यंत.
11048 हुबळी-मिरज एक्सप्रेस 8.8.2019 पर्यंत.
11047 मिरज-हुबळी एक्सप्रेस 9.8.2019 पर्यंत.
11083 एलटीटी-काझीपेट एक्सप्रेस 9.8.2019 पर्यंत.
11084 काझीपेट-एलटीटी एक्सप्रेस 10.8.2019 पर्यंत.
22908 हापा-मडगाव एक्सप्रेस 8.8.2019 पर्यंत.
22907 मडगाव-हापा एक्सप्रेस 9.8.2019 पर्यंत.
11051 सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस 8.8.2019 पर्यंत.
11052 कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस 8.8.2019 ते 10.8.2019 पर्यंत.
11304 कोल्हापूर-मनुगुरू एक्सप्रेस 9.8.2019 पर्यंत.
11303 मनुगुरू-कोल्हापूर एक्सप्रेस 10.8.2019 पर्यंत.
71428 मिरज-कुर्डूवाडी पॅसेंजर 9.8.2019 पर्यंत.
22155 सोलापूर-मिरज एक्सप्रेस 9.8.2019 पर्यंत.

  • वळविण्यात  आलेल्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे :
    12629 यशवंतपूर-निजामुद्दीन एक्सप्रेस 8.8.2019 हुब्ली-गाडाग-बागलकोट-विजापूर-होटगी-सोलापूर-दौंड-मनमाड मार्गे वळविली
    19668 म्हैसूर-उदयपूर सिटी एक्सप्रेस 8.8.2019 हुबळी-गाडाग-बागलकोट-विजापूर-होटगी-सोलापूर-दौंड-पुणे मार्गे वळविली
    12843 पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस 8.8.2019 दुवडा, रयानपाडू, कोंडापल्ली, बल्लारशाह, वर्धा, जळगाव मार्गे वळविली.
    12779 वास्को-दा-गामा-निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस 8.8.2019 मडगाव-रोहा-पनवेल-इगतपुरी-मनमाड मार्गे वळविली

अंतर कमी केलेल्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे :
17614 नांदेड-पनवेल एक्सप्रेस 9.8.2019 ते 11.8.2019 पुणे येथे थांबविण्यात आली.
07617 नांदेड-पनवेल विशेष 10.8.2019 पुणे (शॉर्ट टर्मिनेशन) पर्यंत.
71427 कुर्डूवाडी-मिरज पॅसेंजर 8.8.2019 अरग पर्यंत.
51425 परळी-मिरज पॅसेंजर – 8.8.2019 अरग पर्यंत.
16541 यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस 8.8.2019 धारवार येथे थांबली.
16589 बेंगळुरू-कोल्हापूर एक्सप्रेस 8.8.2019 हुबळी पर्यंत.
12702 हैदराबाद-मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस 8.8.2019 ते 11.8.2019 दरम्यान पुण्यात (शॉर्ट टर्मिनेशन) (दुरुस्त)
17415 तिरुपती-कोल्हापूर एक्सप्रेस 8.8.2019 मिरज येथे पर्यंत (शॉर्ट टर्मिनेशन).
11303 मनुगुरू-कोल्हापूर एक्सप्रेस 8.8.2019 मिरज येथे पर्यंत (शॉर्ट टर्मिनेटेड).
11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस 8.8.2019 पर्यंत (शॉर्ट टर्मिनेशन) कराड येथे.

  • काही अंतरापर्यंत धावणाऱ्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे :
    17613 पनवेल-नांदेड एक्सप्रेस 10.8.2019 आणि 12.8.2019 ही पुणे येथून सुटेल.
    07618 पनवेल-नांदेड विशेष 11.8.2019 पुण्याहून सुटेल.
    16542 पंढरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस 9.8.2019 हुबळी येथून सुटेल.
    16590 कोल्हापूर-बेंगलुरू एक्स्प्रेस 9.8.2019 हुबळीपासून सुटेल.
    12701 मुंबई-हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस 8.8.2019 ते 11.8.2019 रोजी पुणे येथून सुटेल.
    11415 बिदर-कोल्हापूर एक्सप्रेस 9.8.2019 पंढरपूर येथून सुटणार आहे.
    11404 कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस 9.8.2019 ही कुर्डूवाडी येथून सुटेल.
    17416 कोल्हापूर-तिरुपती एक्स्प्रेस 9.8.2019 ही मिरज येथून सुटेल.
    11052 कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस 9.8.2019 ही मिरज येथून सुटेल.
    11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस 9.8.2019 पुण्याहून उगम होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.