BNR-HDR-TOP-Mobile

Pune : नाल्यावर झालेल्या बांधकामाचा अहवाल ‘स्थायी’मार्फत सर्वसाधारण सभेपुढे आणू – रुबल अग्रवाल

एमपीसी न्यूज – अडीच महिन्यांपूर्वी आलेल्या महापुरामुळे नागरिकांच्या घरांत पाणी घुसले. नाल्यावर झालेल्या बांधकामांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी शहर अभियंत्यांना दिल्या आहेत. हा अहवाल स्थायी समितीला सादर केल्यानंतर महापालिका सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज सांगितले.

महापालिका सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड केली. त्यावर प्रशासनाने खुलासा केला. सीमाभिंत बांधण्या संदर्भात पुढील बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे. त्याचा निर्णय सर्वसाधारण सभेला घ्यावा लागणार आहे.

25 सप्टेंबरला आलेल्या महापुरात अनेक नागरिकांचे नुकसान झाले. साडेतीन हजार कर्मचाऱ्यांनी मदत केली. सुमारे 2 हजार मेट्रिक टन कचरा जमा करणयात आला. महसूल विभागा मार्फत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. ड्रेनेज, पाणी, रस्ते करण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत तरतूद करण्यात येणार असल्याचे रुबल अग्रवाल म्हणाल्या.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3