Pune : सनबर्न फेस्टिवल रदद् करण्याबाबत पालकमंत्री गिरीष बापट यांना निवेदन

एमपीसी न्यूज – ऑक्सफर्ड गॉल्फ रिसॉर्ट , बावधन लवळे येथे पार पडणाऱ्या सनबर्न फेस्टिवल रदद् करण्याबाबत आणि आयोजकांना अटक करा या संदर्भात पुणे शहर दहीहंडीया आणि गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीने पालकमंत्री गिरीष बापट यांना निवेदन देण्यात आले.

बावधन लवळे येथे पार पडणाऱ्या सनबर्न फेस्टिवलला वेळेची मर्यादा नसते. मात्र शिवजयंती, दहिहंडी, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव काळात कायद्याचा बडगा दाखवून रात्री 10 वाजता आवाज बंद करण्याची सक्ती केली जाते . मात्र सनबर्न फेस्टिव्हलला आर्थिक गणिते बघून रात्रभर चालवण्यास परवानगी दिली जाते.

सनबर्न फेस्टिव्हलमध्ये रात्रभर अंमली पदार्थाचे प्रचंड सेवन व वापर होत असतो.रात्रभर तरूण मुले मुली दारू पिऊन आणि अंमली पदार्थाचे सेवन करून सनबर्न फेस्टिवल दरम्यान धिंगाना करत फिरतात.यामुळे तरूण पिढीवर वाईट परिणाम होतात. तसेच अमली पदार्थाच्या सेवनामुळे गुन्ह्यांचे प्रमाण वाढू शकते .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.