BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बहिस्थ अभ्यासक्रम बंद न करण्याची कुलसचिव यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी

एमपीसी न्यूज – विदया परीषदेने साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातील बहिस्थ विभाग बंद करण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत खेदजनक आणि बहिस्थ विद्यार्थांवर अन्यायकारक असा आहे. त्यामुळे बहिस्थ अभ्यासक्रम बंद करू नये, या मागणीचे निवेदन स्टुडंट हेल्पींग हँड अध्यक्ष कुलदीप आंबेकर, अण्णा शिरसाट यांच्यासह शिष्टमंडळांनी कुलसचिव यांना दिले आहे. तसेच हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, परिस्थितीमुळे अनेकजण नोकरी करत शिक्षण घेत आहेत. तसेच नोकरी करुन हजारो विदयार्थी, गृहणी बहिस्थ शिकण घेततात. तसेच स्पर्धा परीक्षा करणारी विदयार्थींना या शिक्षण पध्दतीचा फायदा होता. परंतु अशा अचानक निर्णयाने बहुजन समाजातील हजारो विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत.

  • या विद्यापिठाच्या एकंदरीत कार्यपध्दतीवर प्रश्न निर्माण झाले आहे. वारंवार असे वादग्रस्त निर्णय घेऊन त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे? असा प्रश्न पडत आहे. मात्र, बहिस्थ अभ्यासक्रम बंद करू नये अन्यथा, आंदोलन करण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement