Pune : कोथरूडमधून 1 हजार बाटल्या रक्तदानाचा संकल्प : विजय खळदकर

Resolution to donate 1000 bottles of blood from Kothrud: Vijay Khaldakar

एमपीसी न्यूज – सध्या कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रक्ताची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार कोथरूडमधून 1 हजार बाटल्यांचे रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे, अशी माहिती कोथरूड ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय खळदकर यांनी दिली.

रक्तदानाचे पुण्य फार मोठे आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते. सोमवारी ( दि. 25 मे) रक्तदान शिबिराचे  सोशल डिस्टंसिंगचे   पालन करून 100 हून अधिक बाटल्या रक्त संकलन करण्यास हातभार लावला, असेही खळदकर यांनी सांगितले.

कोथरूड ब्लॉक काँग्रेस, कोथरूड युवक व महिला काँग्रेसच्यावतीने हे रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कर्वेनगर साईदास मित्र मंडळ येथे हे शिबिर झाले. यावेळी गृहराज्यमंत्री रमेश बागवे उपस्थित होते.

कोरोना रोगावर नियंत्रण आणण्यासाठी हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. महिना उलटूनही हाताला काम नसल्याने अनेक रिक्षा चालकांसमोर जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे, याचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्वेनगर भागातील सुमारे 500  रिक्षा चालकांना धान्य स्वरूपात वाटप करण्यात आले आहे, असे विजय खळदकर म्हणाले.

रक्तदान आणि गोरगरीब रिक्षाचालक, नागरिकांना अन्नधान्य वाटप केल्याबद्दल रमेश बागवे यांनी समाधान व्यक्त केले. पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल मलके, पुणे शहर ओबीसी सेल अध्यक्ष सहिल केदारी तसेच कोथरुड काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.