Pune : ‘मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील स्थित्यंतरे ‘विषयावरील व्याख्यानास प्रतिसाद

एमपीसी न्यूज – इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 33 व्या (Pune) वार्षिक अधिवेशनात ‘मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील स्थित्यंतरे ‘ या विषयावर ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ.श्रीकांत केळकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. डॉ.नीतू मांडके यांच्या स्मरणार्थ असलेले हे व्याख्यान शनिवार,दि.9 डिसेंबर,दुपारी 12 वाजता टिळक रस्त्यावरील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात झाले.

डॉ केळकर यांच्या वैद्यकीय सेवेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल (Pune)त्यांचा सत्कार इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू वरयानी, डॉ. अलका मांडके यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ.श्रीकांत केळकर हे ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑफ्थॅल्मॉलॉजी’चे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ संजय पाटील, डॉ अलका मांडके, डॉ राजू वरयानी, सौ.अरुणा केळकर, डॉ चारुता मांडके, डॉ जयंत नवरांगे, डॉ गीतांजली शर्मा उपस्थित होते.

 

Talegaon Dabhade : फ्लफीचे फ्रेश चिकन, मटण अन मासे आता मिळणार तळेगावात; खाद्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी

डॉ. श्रीकांत केळकर म्हणाले, ‘भारतातील शल्य चिकित्सा सुश्रुत यांच्यापासून सुरू झाली. युरोप मधून मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुरुवात झाली. पुर्वी शस्त्रक्रिया झाल्यावर 2 दिवस रुग्णाला बेडवरून हलू दिले जायचे नाही. बेड पॅन दिले जात असे. दोन्ही डोळे बांधले जात असत.

नंतर क्रायो सर्जरी, सुचर टेक्निक आले. 1949 साली कृत्रिम भिंग विकसित झाले. 1960 साली फॅको इमुल्सिफिकेशन चे तंत्र आले. आता कॅप्सुलेझर आले आहे.फेको,लेसर, लेन्स अशा प्रक्रिया आता उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना चांगली दृष्टी लाभते, वेळेत कामावर रुजू होता येते. याचे श्रेय संशोधकांना, तंत्रज्ञानाला आणि मानवी प्रयत्नांना जाते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.