Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल पथकांवर मर्यादा

एमपीसी न्यूज – पुण्यातील गणेश विसर्जन (Pune) मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ढोल पथकांवर पोलिसांनी मर्यादा घातली आहे.विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असावा.
Pune : गणेश विसर्जन मिरवणूक सोहळ्यासाठी पुणे पोलिस सज्ज
एका ढोल-ताशा पथकात 50 ढोल आणि 15 ताशांनाच परवानगी असणार आहे. गणेश मंडळांना बेलबाग चौक, सेवासदन चौक आणि टिळक चौकात वादनासाठी प्रत्येकी 10 मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाबाबत आश्वासन दिल्याचे (Pune) पोलिसांनी सांगितले.