Pune : जमीन खरेदीच्या बहाण्याने सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्तांची 66 लाख रुपयांची फसवणूक

एमपीसी न्यूज : भोर येथे स्वस्तात जमीन खरेदीच्या बहाण्याने (Pune) सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्तांची 66 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध फसवणूक करून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेश अंकुश पोटे, संदेश अंकुश पोटे, प्रियंका नीलेश सूर्यवंशी (तिघेही रा. वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
निवृत्त सहायक पोलिस आयुक्त फत्तेसिंह नानासाहेब पाटील (वय 59, रा. भोसलेनगर) यांनी या तिघांविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पाटील यांचा विश्वास संपादन केला आणि भोर येथे स्वस्त दरात जमीन खरेदी करत असल्याचे सांगून जानेवारी 2015 पासून त्यांच्याकडून 60 लाख रुपये घेतले. मात्र, त्यांना जमीन न देता फसवणूक केली.
पाटील यांनी त्यांचे पैसे परत मागितले असता, आरोपीने त्यांच्या (Pune) घरी जाऊन या रकमेवर दावा न करण्याची धमकी दिली. आर्थिक नुकसानीच्या भीतीने, पाटील यांच्याकडून मार्च 2021 मध्ये आणखी 6 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. शेवटी, पाटील यांनी पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यामुळे FIR नोंदवण्यात आली.
Pune : क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील अखेर सापडले