Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा देण्यास सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नकारघंटा

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना रुजू होण्याची विनंती केली होती. मात्र, पुणे महापालिकेच्या विनंतीला या कर्मचाऱ्यांनी मागील 4 दिवसांपासून काहीही प्रतिसाद दिला नाही.

महापालिका प्रशासनातर्फे कोरोनाला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शासनाने नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यास परवानगी दिली आहे.

लवकरच नवीन कर्मचारी सेवेत रुजू होणार असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.