Pune: रिटायर्ड नेव्ही ऑफिसर ला एमटीडीसी चे बुकिंग कॅन्सल करणे पडले महागात, साडे सात लाखांचा बसला गंडा

एमपीसी न्यूज – एमटीडीसी (महाराष्ट्र टुरिझम डेव्लपमेंट  कॉर्पोरेशन) (Pune)वरून बुकिंग कॅन्सल करणे एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन पद्धतीने त्यांना 7 लाख 46 हजार रुपयांचा गंडा बसला आहे.
यावरून उल्हास पंढरीत  गुप्ते  (वय 79 रा. बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Pune)फिर्याद दिली आहे.यावरून 7439326881 या क्रमांक धरकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Maval : टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळाचे वतीने विद्यार्थ्यांना कंपास पेटीचे वाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी एमटीडीसी ला संपर्क करून 7439326881 या क्रमांकावर फोन केला. यावेळी आरोपीने फोन वरून फिर्यादिला  अव्वल डेस्क नावाचे अप डाऊन लोड करण्यास सांगितले.
ते अप वर फिर्यादी याची वयक्तिक माहिती तसेच बँक डिटेल्स भरण्यास सांगितले.आरोपीने फिर्यादी यांचा मोबाईल हॅक करून त्याद्वारे फिर्यादीनुसार बँक खात्यावरील तब्बल 7 लाख 46 हजार परस्पर काढून घेत त्यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

https://www.youtube.com/watch?v=9uFZI7ujChc&ab_channel=MPCNews

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.