Pune : ग्राहक पेठेतर्फे 29 व्या तांदूळ महोत्सवाचे उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज- ग्राहक पेठेतर्फे खजिना विहिर चौकातील केंद्रामध्ये आयोजित तांदूळ महोत्सवाचे उद््घाटन उपमहापौर सरस्वती शेंडेगे यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, उपाध्यक्ष संध्या भिडे, जयराज अ‍ँड कंपनीचे राजेश शहा उपस्थित होते. तांदूळ महोत्सवाचे यंदा 29 वे वर्ष आहे.

सूर्यकांत पाठक म्हणाले, “महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांचे व प्रामुख्याने महिलांचे एकत्रिकरण होत आहे. उत्पादक ते ग्राहक थेट व उत्तम दर्जाचे तांदूळ घाऊक दरात देण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात आहे. इतरत्र भाव वाढले, तरीही महोत्सवात भाववाढ केली जात नाही, हे महोत्सवाचे वैशिष्टय आहे. बासमती, आंबेमोहोर, दुबराज पासून चिन्नौर पर्यंत तब्बल 45 प्रकारचे तांदूळ महोत्सवात आहेत. ग्राहकाने एका वेळेस 100 किलोपेक्षा अधिक तांदूळ खरेदी केल्यास शहरात विनामूल्य घरपोच सेवा दिली जाणार आहे. महोत्सवात उत्तमप्रतीचा तांदूळ थेट दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरातसह नाशिक, मावळ, भोरहून पुणेकरांसाठी उपलब्ध दिला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.