Pune: बारामतीत रिक्षाचालकाला कोरोनाची बाधा, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 40!

एमपीसी न्यूज – बारामतीच्या एका रिक्षाचालकासह एकूण चार नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 40 झाली आहे. 

पुणे शहरात दुबईहून परतलेल्या वडील-मुलीला तसेच बारामती आणि पुणे शहरात प्रत्येकी एक जण असे चार कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील रुग्णांचा आकडा 28 वर गेला आहे, त्यात ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील 12 जण मिळून पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी जवळजवळ निम्मे रुग्ण उपचारांनंतर कोरोनामुक्त झाले आहेत.

बारामतीत कोरोना व्हायरसचा पहिला रूग्ण आढळला  असून तो व्यवसायाने रिक्षा ड्रायव्हर आहे. पुण्याच्या नायडू रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.