Pune : मुकुल माधव फाउंडेशनच्या रितु प्रकाश छाब्रिया यांना ‘एशियन बिजनेस लीडरशिप अवॉर्ड’

एमपीसी न्यूज – फिनोलेक्स इंडस्ट्रीज संलग्नित मुकुल माधव फॉउंडेशनच्या (एमएमएफ) व्यवस्थापकीय विश्वस्त रितु प्रकाश छाब्रिया यांना दुबई येथे
झालेल्या सोहळ्यात ‘एशिया बिजनेस लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.दुबई येथील जुमेराह एमिरेट्स टॉवर्स हॉटेलमध्ये झालेल्या या सोहळ्यात संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) कॅबिनेट सदस्य आणि मिनिस्टर ऑफ टॉलरन्स शेख नाहायन यांच्या हस्ते रितु छाब्रिया यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या क्षेत्रात रितु छाब्रिया यांनी आरोग्य, शिक्षण युवक व क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. छाब्रिया यांच्यासह देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या 15 मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. रितु छाब्रिया यांनी आपल्या भाषणात ‘एबीएलएफ’चे या पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले.

पुरस्कार निवड समिती आणि सल्लागार मंडळाने केलेल्या या सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. समाजात दीर्घकालीन बदल घडवण्यासाठी आणि या बदलाची परंपरा निर्माण करण्यासाठी, तसेच समाजाच्या वंचित घटकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ‘सीएसआर’ हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. आपण हे कार्य परस्पर सहकार्यानेच करत आहोत. या पुरस्काराने आमच्या प्रयत्नांना प्रोत्साहन आणि बळ मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.