-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune : रोड सेफ्टी वॉकेथॉनला चांगला प्रतिसाद

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने लष्कर भागात ‘ रोड सेफ्टी वॉकेथॉन’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

लष्कर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित या उपक्रमात आझम कॅम्पस, महात्मा गांधी रस्ता परिसरात वाहतूक सुरक्षा विषयक जनजागृती करण्यात आली. मोटार व्हेईकल अॅक्ट 2019 ची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, प्राध्यापक मोठया संख्येने सहभागी झाले.३१ व्या रस्ते सुरक्षा सप्ताह निमित्त 17 जानेवारी रोजी आयोजित या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.