Pune : पुण्यात लुटमारीच्या घटना वाढल्या; शिवाजीनगर आणि कात्रज परिसरात कोयत्याच्या धाकाने लुबाडले

एमपीसी न्यूज – पुणे शहर आणि परिसरात मागील (Pune) काही दिवसांपासून लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. शहरातील शिवाजीनगर आणि कात्रज परिसरात एकाच दिवसात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या आहेत. शिवाजीनगर येथील बांबू हाऊस आणि कात्रज घाटातील भिलारेवाडी येथे हा प्रकार घडतात.
शिवाजीनगर परिसरातील बांबू हाऊस येथे फिर्यादी गोविंदा साखरे हे 28 मे रोजी पहाटेच्या सुमारास कार पार्क करीत होते. यावेळी दुचाकीवरून तिघेजण त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी यांच्याकडे मोबाईल आणि पैशाची मागणी केली. फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपींनी त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करत खाली पडले. त्यांच्या डोक्यात जड वस्तूने प्रहार केला आणि गळ्यातील सोनसाखळी आणि मोबाईल असा एक लाख पस्तीस हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला.

Pimpri : कृत्रिम अवयव मोफत वाटप शिबिराचा 78 लाभार्थींनी घेतला लाभ

तर दुसरी घटना ही भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिलारेवाडी परिसरात घडली. फिर्यादी देवानंद गालफाडे हे भोर येथून कात्रज गाव येथे कारणे येत होते. त्यावेळी तिघांनी हॉर्न वाजवून फिर्यादी यांची कार थांबवली. कार थांबवल्यानंतर आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील एक लाख रुपयांची सोनसाखळी चोरून नेली. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.