Pune : कोयते व बंदुकीचा धाक दाखवत गुंडांनी घातला वाईन शॉपवर दरोडा

एमपीसी न्यूज – उत्तम नगर भागात हातात कोयते आणि बंदुक घेऊन काही  गुंडांनी  दहशत ( Pune ) माजवत वाईन्स शॉप वर  दरोडा घातला.पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजताना दिसत आहेत. 

या प्रकरणी उत्तम नगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 24 तासानंतरही या  गुंडांना पडकण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

Maharashtra : कोरोनामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे अहवाल सादर करा – उच्च शिक्षण विभाग

याबद्दल अधिक माहिती अशी की, उत्तम नगर भागात हातात कोयते आणि बंदुक घेऊन काही  गुंडांनी  दहशत माजवली. त्यानंतर या गुंडानी कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवत आर आर वाइन्स दुकानातून जवळपास 3 लाख रुपयांची रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या.या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सध्या  फरार ( Pune ) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.