BNR-HDR-TOP-Mobile

Pune : सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी आठ दिवसात जेरबंद ; 91 लाखांचा ऐवज हस्तगत

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी आठ दिवसात जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीचा तब्बल 91 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. 31 डिसेंबर 2018 ला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कुरंगवाडी रोड येथे कोयत्याचा धाक दाखवून ही जबरी चोरी करण्यात आली होती.

याप्रकरणी भरत मोहनलाल सोलंकी यांनी राजगड पोलीसात फिर्याद दिली होती.कैलास लक्ष्मण धरपाळे ( वय 27, रा. वांजळे, वेल्हे),वृषभ उर्फ मुन्ना विकास भगत (वय 23 रा.घोटावडे फाटा,तालुका मुळशी),बापू बाळू भोसले(वय 23, रा. कात्रज ) गोकुळ उर्फ सखाराम खुळे (वय 29, रा. तालुका वेल्हा )निलेश पांडुरंग डिंबळे(वय  25, रा. आंबेगाव पठार ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहन सोलंकी यांचा भाऊ किरण सोलंकी हे वेल्ला येथून स्विफ्ट कारने पुण्याकडे जात होते. कुरंगवाडी गावाजवळून ते सायंकाळी जात असताना चार अनोळखी इसम दोन दुचाकी घेऊन त्यांच्याजवळ आले. आणि त्यांनी सोलंकी यांना त्यांची कार आमच्या दुचाकीला घासून त्याचे नुकसान केले आहे. असा बहाणा करून त्यांच्याशी वाद घातला. एवढेच नाही तर त्यांनी सोलंकी यांना त्यांच्याच कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि परत वांगणी फाट्याहून कुसगावकडे नेले. आणि त्यांना मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या जवळील काही रोकड आणि सोन्याचांदीचे दागीने असा तब्बल 1 कोटी 9 लाख 45 हजार 940 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

आरोपींनी कोणताही सुगावा मागे न सोडता ही जबरी चोरी केली होती. परंतु पोलिसांनी केवळ 8 दिवसांत त्यांच्या बातमीदारांकडून माहिती काढून तसेच तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा 91 लाख 8 हजार 640 रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, उप विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस नाईक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश क्षीरसागर, सहाय्यक फौजदार सुनील बांदल, दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार दत्ता जगताप, पोलीस नाईक पोपट गायकवाड, चंद्रशेखर मगर, अक्षय जावळे, महेश मुंढे, राजेंद्र थोरात, मोरेश्वर इनामदार, अन्सार कोरबु, अक्षय नवले, राम घोंडगे, दयानंद लिमण, चंद्रकांत झेंडे, जगदीश शिरसाठ, राजेंद्र चंदनशिव, नितीन भोर, नवले, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस हवालदार कुतवळ, कोळेकर, होळकर, शेख यांनी केली आहे.

HB_POST_END_FTR-A4

.