Pune : अदिती येवले म्हणते, ‘श्रेया’ या भूमिकेने ओळख मिळवून दिली

एमपीसी न्यूज – वेलकम जिंदगी, विकून टाक, नेबर्स अशा चित्रपटातून दमदार भूमिका साकारणारी आदिती येवले म्हणते कुलस्वामिनी मालिकेतली श्रेया या भूमिकेमुळे तिला ओळख मिळाली. नेबर्स हा तिचा चित्रपट कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे पुढे गेला.

मराठी इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळवणारी अभिनेत्री अदिती येवले, भूमिकेची जाण आणि सतत काहीतरी नवीन करण्याची धडपड अदिती मध्ये जाणवते. आजवर तिने वेलकम जिंदगी, विकून टाक, नेबर्स अश्या चित्रपटातून तिने भूमिका केल्या असून एक नंबर, रुंजी, तसेच कुलस्वामिनी अश्या अनेक मालिकांमधून ती रसिकांच्या समोर आली आहे. कुलस्वामिनी या मालिकेतली श्रेया या भूमिकेमुळे आपल्याला ओळख मिळाली असल्याचे ती मान्य करते. आदितीकडे सध्या मराठी सोबतच काही पंजाबी चित्रपटाच्या देखील ऑफर्स आहेत. कथा चांगली असेल तर निश्चित त्यामध्ये काम करायला आवडेल, असं अदिती सांगते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.